सातारा : आ. शिवेंद्रराजेंसह ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल

बुधवारी सकाळी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये वादावादी झाली हाेती. यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात आ. शिवेंद्रराजे यांच्यासह 80 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संपत महादेव जाधव यांनी संशयितांनी माझ्या शेतजमीनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी दिलयाची तक्रार केली आहे. दरम्यान, संशयितांमध्ये नगरसेवक, सरपंच यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.
आ. शिवेंद्रराजे भोसले, विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, अमीन कच्छी, विजय पोतेकर, रमेश चव्हाण, राजेंद्र नलावडे, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, फिरोज पठाण, रवी ढोणे, अमित महिपाल यांच्यासह 80 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, काल रात्री खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकावर गुन्हा दाखल करण्यात आला हाेता. यानंतर आ. शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे सध्या परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्या आहेत, अशी माहिती पाोलिसांनी दिली.