म्हाळेवाडी ग्रामस्थांनी रक्षाविसर्जनातून दिला पर्यावरणपूरक संदेश…

प्रतिनिधी
म्हाळेवाडी ता. चंदगड येथील श्री. पंत संप्रदायातील ज्येष्ठ गुरुबंधू व्यक्तिमत्व *कै. तानाजी मष्णू पाटील* यांचे दि. २१ रोजी दुःखद निधन झाले. त्यांच्या अंत्यसंस्कारावेळी म्हाळेवाडीचे *सरपंच श्री. सी. ए. पाटील सर* यांनी श्रद्धांजली वाहताना स्मशानभूमी सुशोभिकरणसाठी लावण्यात आलेल्या झाडांना *रक्षाविसर्जन* करावे… असे आवाहन कै. तानाजी पाटील यांच्या कुटुंबियांना केले होते… त्याला चांगला प्रतिसाद मिळाला… कै. तानाजी पाटील यांचे पुत्र नागोजी, मनोहर, राजेंद्र व बंधू रामचंद्र तसेच अन्य नातेवाईक व कुटुंबियांनी रक्षाविसर्जन स्मशानभूमीतील झाडांना करुन एक नवीन पुरोगामी विचारांना चालना देणारे कार्य केले आहे…त्यामुळे नदीतील पाण्याचे होणारे प्रदूषण थांबवण्यासाठी म्हाळेवाडीकरांनी घेतलेला हा पर्यावरणपूरक निर्णय खरोखरच इतरांना प्रेरणादायी आहे… म्हाळेवाडी ग्रामस्थांनी एक आगळावेगळा आदर्श उपक्रम सर्वांसमोर ठेवला आहे.. त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे….