ताज्या बातम्यामहाराष्ट्र
मुरगुड : वेदगंगा नदीत बुडून ८० वर्षीय वृध्देचा मृत्यू

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
मुरगूड -निढोरी मार्गावरील निढोरी पुलाशेजारी मुरगूडच्या हद्दीत वेदगंगा नदीत बुडून दौलतवाडी (ता. कागल) येथील वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. रुक्मिणी बचाराम कांबळे वय (८०) असे मयताचे नाव आहे. या महिलेची आत्महत्या आहे की अन्य काय कारण आहे याचा तपास मुरगूड पोलीस करीत आहेत.
सोमवारी सायकांळच्या सुमार मुरगूड निढोरी मार्गावरील मुरगूड गावाच्या हद्दीत वेदगंगा नदीच्या पात्रात पाण्यात बुडून रुक्मिणीबचाराम कांबळे या वृध्द महिलेचा मृत्यू झाला आहे. मात्र ही आत्महत्या आहे की अन्य काही कारणे आहेत. याबाबत मुरगूड पोलीस तपास करीत असून याबाबतची फिर्याद दिंगबर सुनिल कांबळे यांनी मुरगूड पोलीसात दिली आहे. तपास पोलीस नाईक माने करीत आहेत.