बेलवळे खुर्द येथे गुणवंत विद्यार्थी, शिक्षकांचा सत्कार

बिद्री प्रतिनिधी :
बेलवळे खुर्द ( ता. कागल ) येथील प्राथमिक शाळेच्या पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा , चौथी प्रज्ञा शोध परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गटशिक्षणाधिकारी डॉ.जी.बी. कमळकर होते.
यावेळी पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत चांगल्या गुणांनी यशस्वी झालेल्या आठ विद्यार्थ्यांचा आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या पूनम उमेश पाटील यांचा तर प्रज्ञाशोध परीक्षेचे मार्गदर्शक शिवानंद हिंगे यांचा गटशिक्षणाधिकारी डॉ.जी. बी. कमळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी बाजार समितीचे माजी सभापती दिनकरराव कोतेकर,शिवसेना तालुकाप्रमुख अशोक पाटील, सरपंच रेश्मा पाटील, जे.बी. पाटील, शहाजी पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष तानाजी पाटील, ग्रा.पं. सदस्य युवराज वाईंगडे यांच्यासह पालक , शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
प्रभारी मुख्याध्यापक तुकाराम राजुगडे यांनी प्रास्ताविक केले. गीता खोत यांनी सूत्रसंचालन केले तर आभार पूनम पाटील यांनी मानले .