राधानगरी : गगनगिरी मठ अंतर्मनाचे सव्हिसींग सेंटर व्हावे : प्रा.अनिल भागाजे

राधानगरी प्रतिनिधी : प्रतिश पाटील
बुरंबाळी ता.राधानगरी येथील गगनगिरी आश्रमाचा पाचवा वर्धापन दिन भक्तांच्या उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला . यावेळी व्याख्याते गुरुवर्य प्रा अनिल भागाजे यांचे आश्रमाच्या वतीने अध्यात्मिक व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते . यावेळी उपस्थितीना उदबोधन करताना प्रा भागाजे आणि मौलिक विचार व्यक्त केले . ते म्हणाले .*आधुनिक काळात घरादारांत , समाजात अस्वस्थपणा , अनाचार व अनास्था वाढत चालले आहे . घराघरात विसंवादामुळे गैरसमज वाढत आहे . अशा वेळी सर्व भाविकांना गगनगिरी आश्रमासारखे स्थळ अध्यात्मिक केंद्र परिवर्तनाची प्रेरक केंद्र बनेल .प. पू. गगनगिरी महारांजाचे आशिर्वाद आणि मठाधिपती श्री सदानंदागिरी यांचे अनमोल मार्गदर्शन यामुळे अल्पावधीत हे आश्रम तमाम भाविकांच्या आत्म्यांचे सव्हींसींग सेंटर बनेल असा आशावाद त्यानी व्यक्त केला .
आमावस्या व पाडव्याच्या शुभमुहूर्तावर या आश्रमाचा पाचवा वर्धापनदिन मोठया उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी मठाधीपती श्री सदानंदगिरी महाराज यांनी उपस्थितांचे स्वागत करून पाच वर्षातील अध्यात्मीक वाटचाल यावर सुंदर विवेचन केले .
वर्धापन दिनास इस्लामपूर , ओझर्डे , बारगेवाडी ,वडणगे, तारळे खुर्द , मोहडे, चापोडी , कोदवडे, पुंगाव , शिरगांव , धामोड , तळगाव, कुदळवाडी, याबरोबर बुरंबाळी येथील जवळपास ३००हून अधिक भाविक तसेच इस्लामपूर मठाचे मठाधिपती श्री शामराव महाराज उपस्थित होते .
यावेळी सकाळी ठीक .८ .३० ते १२.३० वा दरम्यान यज्ञहवन व महाआरती , त्यानंतर महाप्रसाद , दुपारी १.३० वा कुदळवाडी येथील भजनी मंडळाचा भजन किर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला , आभार मांजरवाडीचे भक्त श्री सातापा चौगले यांनी मानले .