ताज्या बातम्यामनोरंजनमहाराष्ट्र

कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन खरी कॉर्नर येथे उत्साहात पार

कोल्हापूर प्रतिनिधी : रोहन भिऊंगडे

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळातर्फे दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी १०२ वा ‘‘कोल्हापूर चित्रपट व्यवसाय वर्धापन दिन समारंभ’’ कॅमेरा मानस्तंभ, खरी कॉर्नर, कोल्हापूर येथे बुधवार दि.१ डिसेंबर २०२१ रोजी सकाळी  ठीक १० वाजता साजरा करण्यात आला. मा.श्री विजयरावजी(बापू) बोंद्रे, मानद सचिव, श्री शहाजी छत्रपती महाविद्यालय व मा.श्री. बिंदू मोरे, जेष्ठ कार्यकर्ते, यांच्या हस्ते कलामहर्षि बाबुराव  पेंटर व आनंदराव पेंटर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच चित्रपट महामंडळाचे माजी अध्यक्ष, निर्माते, दिग्दर्शक,लेखक मा.श्री. भास्करराव जाधव,यांच्या हस्ते कॅमेरा मानस्तंभ पूजन करण्यात आले. यावेळी श्रीमती विजयमाला मेस्त्री (पेंटर) यांच्या व संस्थेचे उपाध्यक्ष मा.श्री.धनाजी यमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर वर्धापन दिन संपन्न झाला.यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष श्री.धनाजी यमकर, सहखजिनदार शरद चव्हाण, संचालक रणजित जाधव, रवि गावडे, सतीश बिडकर, अशोक पेंटर, तसेच जेष्ठ अभिनेते भालचंद्र कुलकर्णी, उदयसिंह मराठे, मिलिंद अष्टेकर, विजय शिंदे बाबा पार्टे अमर मोरे, इम्तियाज बारगीर, चंद्रकांत निकम,सदानंद सुर्यवंशी, राहुल राजशेखर,मिलिंद ओक, सुभाष  गुंदेशा, राजू पाटील, प्रकाश निकम, सचिन वारके, सर्जेराव पाटील, शाम काणे, किरण पोटे, महादेव साळुंखे, महेश पन्हाळकर, बाबा पार्टे, शोभा शिराळकर, हेमुसवर्णा मिरजकर,बबीता काकडे,  वनिता दिक्षित, सुनंदा वाळवेकर, श्रीकांत नरुले, उमेश बुधले तसेच चित्रपट महामंडळाचे प्रमुख व्यवस्थापक रवींद्र बोरगांवकर, नम्रता आरडे- गोडबोले, सिद्धेश मंगेशकर, अरुण पाटील, ऐश्वर्या पाटील मान्यवर चित्रपट व्यावसायिक  उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks