शिरोली दूमाला येथील रत्नदीप दिपक पाटील यांना एमबीबीएस डाॅक्टरेट

सावरवाडी प्रतिनिधी :
करवीर तालुक्यातील शिरोली दुमाला येथील रत्नदीप दिपक पाटील यांनी (MBBS) डाॅक्टरेट पदवी प्राप्त केली .
त्यांचे प्राथमिक शिक्षण शिरोली दूमाला येथील जि प शाळेत झाले . उच्चमाध्यमिक शिक्षण घोडावत काॅलेज येथे झाले..तर MBBS शिक्षण धुळे येथील जवाहर मेडिकल फाउंडेशन येथे पूर्ण झाले. ACPM मधून त्यांना MBBS डाॅक्टरेट प्रदान करण्यात आली…रत्नदीपचे वडील दिपक पाटील हे गोकुळ दूध संघात सूपरवायझर म्हणून कार्यरत आहेत तर चूलते सोलापूर येथे मोटर वाहन निरीक्षक (RTO) पदावर रुजू आहेत.
आपल्या कूटूंबियांच्या आशिर्वादामूळेच मी हा शैक्षणिक टप्पा पूर्ण करू शकलो.असे मत रत्नदीप पाटील . यांनी व्यक्त केले .या प्रसंगी महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकास मंत्री मा हसनसो मुश्रीफ ,राज्याचे गृहराज्यमंत्री मा सतेज उर्फ बंटी पाटील , गोकुळचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक मा विश्वासराव पाटील (आबाजी)यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देवून सत्कार केला .