महाराष्ट्र कडक लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, राज्य सरकार कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत

मुंबई प्रतिनिधी :
राज्यात 2 एप्रिलपासून मिनी लाॅकडाऊन घोषित करण्यात आला होता. राज्यात सर्वत्र कडक निर्बंध लादण्यात आले. त्यानुसार शुक्रवारी रात्री 8 वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत राज्यात पुर्णतः लाॅकडाऊन लावला आला आहे. तर आता येत्या काही दिवसातील सुट्ट्या पाहता राज्यात 10 दिवसांचा किंवा 3 आठवड्याचा पुर्ण लाॅ़कडाऊन लावला जाण्याची शक्यता आहे.
12 एप्रिल ते 18 एप्रिलमध्ये दोन दिवस सार्वजनिक सुट्ट्या आल्या आहेत. तर विकेंड लाॅकडाऊनचे 2 दिवस, असे मिळून 4 दिवस कामाचे दिवस नाहीत. तर गुरूवार आणि शुक्रवार हे दोनच दिवस कामाचे अधिकृत दिवस आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा 100% लाॅकडाऊन लावायचा प्रयत्न असणार आहे.
सध्याचा विकेंड लाॅकडाऊन उपयोगाचा नसून राज्यात 3 आठवड्याचा लाॅकडाऊन करावाच लागेल, असं मदत आणि पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. त्यानंतर राज्यात पुन्हा पुर्णतः लाॅकडाऊन लागेल की काय अशी भिती लोकांमध्ये आहे. तर यासंदर्भात शनिवारी दुपारी मुख्यमंत्री एक महत्वाची बैठक घेणार आहेत.
दरम्यान, या बैठकीआधी मुख्यमंत्री सर्वपक्षिय नेत्यांशी संवाद साधणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यानंतर हा निर्णय घेतला जाईल. सामान्यांसोबतच याचा फटका व्यापारी वर्गाला बसणार आहे.