रा बा पाटील विद्यालयातील महात्मा वस्तिगृहातील विध्यार्थ्यांना ब्लँकेट वाटप कार्यक्रम संपन्न

सावरवाडी प्रतिनिधी :
दुर्गम भागातील स्वावलंबी गोरगरिब होतकरू विद्यार्थ्यांना शिक्षणास चालना मिळावी या उदात हेतूने करवीर तालुक्यातील सडोली खालसा येथील रा बा पाटील विद्यालयाच्या महात्मा वसतिगृहातील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना ब्लँकेट,साबण व कोलगेट वाटप करण्यात आले. अध्यक्षस्थानी बाळासाहेब साळोखे होते .
गावातील उमेश पांडुरंग कुंभार यांनी. कोरोनाच्या महामारीच्या काळात अनेक कुटुंबाना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले होते .
यावेळी बोलतांना उमेश कुंभार म्हणाले स्पर्धेच्या युगात खूप अभ्यास करून व यश मिळवून विध्यार्थ्यांनी देशाचे नाव उज्ज्वल करावे
कार्यक्रम प्रसंगी मुख्याध्यापक नेर्लेकर ,मारुती साळोखे, व्यसनमुक्ती राज्य पुरस्कार प्राप्त अध्यापक श्री एकनाथ कुंभार आदिची भाषणे झाली .
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अध्यापक धनाजी कुंभार, विशाल मगदूम, कृषी विस्तार अधिकारी श्री रविंद्र कुंभार,काशिनाथ कुंभार ,सिद्धेश कुंभार, बाळासो साळोखे, तानाजी पाटील,विशाल चव्हाण यांनी विशेष प्रयत्न केले.
प्रास्ताविक कला शिक्षक रावजी शिंदे यांनी केले व आभार नेर्लकर यांनी मानले. यावेळी विद्यार्थी , शिक्षक ग्रामस्थ उपस्थितीत होते .