शेतीविषयक कामांना खो : बळीराजा चिंतातूर

कुडूत्री प्रतिनिधी :
सततच्या पावसामुळे बळीराजाची शेतीविषयक कामे खोळंबली आहेत. त्यामुळे बळीराजा चिंतातुर झाला आहे. शेतातील पिके काढणे व मशागतीची कामे खोळंबल्याने अवकाळी पावसाचा सामना शेतकऱ्यांना पावसाळ्यापूर्वी करावा लागत आहे.
पावसाळ्यापूर्वी म्हणजे मे महिन्यात सर्वत्र शेतकरी वर्गाचा शेतातील पिके काढण्यावर व शेती मशागत कामावर भर दिला जातो.अधून मधून पडणाऱ्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या शेतीविषयक कामाला खो बसला आहे. शेतातील उन्हाळी भात, भुईमूग, मक्का, तसेच अन्य पिके काढण्याचे काम खोळंबले आहे.सततच्या पावसामुळे जमिनीला घात नसल्यामुळे ऊस पिकाच्या भरण्या देखील खोळंबल्या आहेत.त्याबरोबर जनावरांची वैरण,लाकूडफाटा भरणे आदी कामे खोळंबली आहे.
असाच अधून मधून पाऊस कोसळू लागला तर मात्र शेतकऱ्यांची डोकेदुखी ठरणार आहे.पावसाने पुढील काळात उघडीप दिली तर मात्र काही अंशी कामे साधली जाणार आहेत.