ताज्या बातम्यामहाराष्ट्र
राजे बँकेच्या संचालकपदी दत्तामामा खराडे यांची बिनविरोध निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
शिंदेवाडी, ता. कागल येथील दत्तामामा खराडे यांची कागल येथील राजे विक्रमसिंह घाटगे सहकारी बँकेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली. खराडे सध्या कोल्हापूर जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत. त्यांनी बिद्री साखर कारखान्याचे संचालकपदही भूषवले आहे. गडहिंग्लज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती म्हणून काम पाहिले, तर शिंदेवाडीचे माजी सरपंच राहिले आहेत.