भुदरगड मध्ये सद्गुरु बाळूमामा फौडेशन मार्फत कोरोनारूग्णांसाठी एक हात मदतीचा उपक्रमास प्रारंभ.

मुदाळतिट्टटा प्रतिनिधी :
भुदरगड मध्ये सद्गुरु बाळूमामा फौडेशन मार्फत कोरोनारूग्णांसाठी एक हात मदतीचा उपक्रमास प्रारंभ.
साऱ्या जगावर कोरोनाचे संकट घोंगावणा-या भीतीदायक व अविश्वास पूर्ण वातावरणात सुद्धा अनेक चांगल्या घटना पहायला मिळतात .यातून माणुसकी जिवंत असल्याचे पाहायला मिळते यातूनच प्रेरणा घेऊन अनेक जण चांगले काम करण्यास प्रवृत्त होतात हीच प्रेरणा घेऊन व तहसीलदार भुदरगड यांचे सहकार्याने आदमापुर( ता.भुदरगड ) येथील श्री.सद्गुरू बाळुमामा फौंडेशन मार्फत भुदरगड मधील कोरोना रुग्णांसाठी शाकाहारी बिर्याणी देऊन त्यांना अल्प भोजन पुरवण्याचा उपक्रम अक्षय तृतीया पासून सुरू झाली असून दररोज किमान २०० जणाला याचा लाभ होणार यासाठी फौंडेशनला सहकार्याची भूमिका घेणाऱ्या देणगीदारांनी प्रतिदिन तीन हजार रुपये देऊन उपकृत करण्याचे ठरविले आहे त्याच बरोबर वस्तू रूपात सुद्धा देणगी स्वीकारण्याची सोय फौंडेशन मार्फत करण्यात आली आहे .श्री बाळूमामा समाधी स्थळ मरगुबाई मंदिर येथून या उपक्रमाची सुरुवात करण्यात येणार आहे. अशी माहिती फौंडेशनचे अध्यक्ष आदमापुर चे सरपंच विजयराव गुरव यांनी दिली.
यावेळी फौंडेशनचे देवस्थानचे अध्यक्ष- धैर्यशिल भोसले ,पी.एल. पाटील, प्रकाश खापरे, सागर पाटील , गुंडोपंत पाटील,एल.जी.पाटील, शिवप्रताप पाटील इत्यादी हजर होते.