ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वेदगंगा नदीपात्रात सुरुपली जवळ आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कागल तालुक्यातील सुरुपली येथील वेदगंगा नदीचे पाणीपात्रातील जॅकवेलजवळ अंदाजे ४५ ते ५० वयाच्या अनोळखी पुरुष जातीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला. याबाबतची वर्दी पोलीस पाटील शिवाजी गोविंद कुंभार यांनी मुरगूड पोलिसात दिली.
अनोळखी मृतदेहाचे वर्णन असे-अंगाने मध्यम, अंगात पांढरया रंगाचा उभ्या लाईन असलेला हाफ शर्ट, तपकिरी कलरची फुल पँट व कमरेला लाल रंगाचा टॉवेल गुंडाळलेला. अधिक तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल शिंदे करीत आहेत.