ताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोराना विषाणू प्रतिबंधात्मक सुधारित आदेश! महाराष्ट्र शासनाकडील निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा म्हणून खालील बाबींचा समावेश करण्यात येत आहे

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे

ज्या उत्पादन केंद्रामध्ये कर्मचारी/कामगार यांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी/ कारखान्याच्या परिसरात केली असेल किंवा कर्मचारी / कामगारांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे विलगीकरणात केली असेल, आणि कर्मचारी/ कामगारांची हालचाल स्वतंत्रपणे होत असेल अशी केंद्रे जास्तीत-जास्त 10 टक्के व्यवस्थापनाशी संबंधीत कर्मचारी बाहेरून येत असतील तर सुरू ठेवता येतील. परंतु कर्मचारी/कामगार यांच्या उत्पादन केंद्राबाहेरील हालचालीस या अधिसूचनेच्या अंतिम दिवसापर्यंत प्रतिबंध असेल, असे सुधारित आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्ह्यात दिनांक 01 मे 2021 रोजीचे सकाळी 07.00 वा. कोरोना विषाणू (कोव्हिड-19) संसर्ग साखळी तोडण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश पारित करण्यात आलेला आहे.
महाराष्ट्र शासनाकडील उपरोक्त वाचले क्र. 9 अन्वये देणेत आलेल्या निर्देशानुसार अत्यावश्यक सेवा म्हणून खालील बाबींचा समावेश करण्यात येत आहे.
a. वन विभागाने घोषित केल्यानुसार वनीकरण संबंधी सर्व कामकाज.
b. विमानचलन आणि संबंधित सेवा (विमान कंपन्या, विमानतळ, देखभाल दुरूस्ती, कार्गो, ग्राऊंड सर्व्हिसेस, केटरिंग, इंधन भरणे, सुरक्षा इ.)
तसेच इकडील उपरोक्त वाचले क्र. 8 मधील नमूद आदेशातील मुद्दा क्र. 5d उत्पादन क्षेत्र यामधील b मध्ये खालीलप्रमाणे दुरूस्ती करण्यात येत आहे.
या ऐवजी
b. वरील सर्व उद्योगांनी त्यांचे कामगारांसाठी राहणेची सुविधा कामाचे ठिकाणी उपलब्ध करणे किंवा स्वतंत्र अलगीकरण असलेल्या ठिकाणी करावी जेणेकरून कामगाराच्या हालचाली या कोणाशीही संपर्क न येता होतील. बाहेरून येणाऱ्यामध्ये फक्त 10 टक्के व्यवस्थापकीय कर्मचारी काम करू शकतात. सदर अधिसूचना संपेपर्यंत कामगारांना कामाच्या ठिकाणाच्या क्षेत्राबाहेर हालचाली करता येणार नाहीत. सदर उद्योग हे त्यांना आवश्यक असलेल्या शिफ्टमध्ये सुरू राहतील.
असे वाचावे
b. ज्या उत्पादन केंद्रामध्ये कर्मचारी/कामगार यांची राहण्याची व्यवस्था कामाच्या ठिकाणी/ कारखान्याच्या परिसरात केली असेल किंवा कर्मचारी / कामगारांची राहण्याची व्यवस्था स्वतंत्रपणे विलगीकरणात केली असेल आणि कर्मचारी / कामगारांची हालचाल स्वतंत्रपणे होत असेल अशी केंद्रे जास्तीत-जास्त 10 टक्के व्यवस्थापनाशी संबंधित कर्मचारी बाहेरून येत असतील तर सुरू ठेवता येतील. परंतु कर्मचारी/कामगार यांच्या उत्पादन केंद्राबाहेरील हालचालीस या अधिसूचनेच्या अंतिम दिवसापर्यंत प्रतिबंध असेल.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks