कोल्हापूर : महे कसबा बीड दरम्यान भोगावती नदी पात्रातील कठड्याला दुचाकी धडकून युवक ठार
सावरवाडी प्रतिनिधी :
महे कसबा बीड येथील भोगावती नदीवरील पुलाच्या संरक्षक कठड्याला दुचाकी वरील नियंत्रण सुटल्याने जोरदार धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. संजय राजाराम आंबी (वय २३) असे या मयत तरूणांचे नावं आहे.
संजय हा दुपारी एक वाजण्याच्या सुमारास कामावरून घरी येत होता. महे व कसबा बीड दरम्यान च्या पुलाच्या संरक्षक कठड्याला दुचाकी ने जोरदार धडक दिली. धडक इतकी जोरदार होती की संरक्षक कठड्याचा पिलर तुटून दुचाकी सुमारे २० फुट नदी पात्रात पडली. दुचाकी सह तरूण खडकाळ जागेवर जोरात पडल्याने डोक्याला जोरदार मारा लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी लोकांची मोठी गर्दी झाली होती. त्याला सीपीआर येथे दाखल केले पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. संजय हा कोल्हापूरात एम आय डी सी मध्ये मोटर रिवायडींग चे काम करत होता. तो एकुलता एक होता. संजय चे वडील ही मोटर रिवायडींग चे काम करत आहेत.