कोल्हापुर हिंदुत्ववादी संघटनेने छत्रपती शिवाजीमहाराज चौकात श्री रामाच्या फोटोचे पुजन करून व प्रसाद वाटुन रामनवमी केली साध्या पध्दतीने साजरी

कोल्हापुर :-
चैत्र महिन्यातील पहिल्या पंधरवड्यातील नवव्या दिवसाला ‘रामनवमी ‘ म्हणतात. वर्षाच्या प्रारंभीच्या महिन्यातील हा सर्वात मोठा उत्सव होय या वेळी दुष्ट शक्तींना ज्यावेळी भूतलावरील सज्जनांना त्राही भगवान् करून सोडले, तेव्हा या दुष्ट शक्तीच्या निर्दालनासाठी श्रीविष्णूने भूतलावर अवतार घ्यावयाचे मान्य केले होते. हा अवतार म्हणजेच प्रभू रामचंद्र. ज्याना पाहून मन रमते, आकर्षित होते, मनुष्य स्वतःला विसरून जातो, मुग्ध होतो, भारावून जातो अशी व्यक्ती म्हणजे श्री राम. या दिवशी प्रभू रामचंद्रांचा जन्म झाला.
तेव्हा अयोध्येचे राजे दशरथ राज्य करीत होते. त्याचं राज्य मोठं व सुखी होतं. परंतु राजे मात्र दुःखी होते. कारण त्याना मुलंबाळं नव्हते. म्हणून त्याने वसिष्ठ ऋषींच्या सांगण्यानुसार मोठा यज्ञ केला. या यज्ञामुळे देव प्रसन्न झाले व ‘ईच्छा लवकर पुरी होईल’ असा आशीर्वादही दिला. महिने निघून गेले. आनंदी वातावरण अयोध्या नगरीत दिसू लागले. कौसल्या राणीना मुलगा झाला. हा मुलगा म्हणजे श्री राम.
श्री राम हे सत्यवचनी व आज्ञाधारक होते. लढाईत अचूक बाण मारीत असे म्हणून ‘राम-बाण ‘ असा आता संकेत ठरला आहे. कित्येक राक्षसांना त्याने ठार मारले. हनुमानाच्या साहाय्याने रावणाचा वध केला.
राम एकबाणी, एकवचनी व एकपत्नी होते, म्हणूनच रामचंद्राना ‘ मर्यादापुरुषोत्तम ‘असे म्हटले आहे. श्रीराम हे आदर्श पुत्र, आदर्श पती, बंधू, शिष्य, पिता होते. श्रीराम आपल्या अमोघ पण पवित्र शौर्याबद्दल इतके प्रसिद्ध होते कि, प्रत्यक्ष श्रीकृष्णांनी आत्मविभूती सांगताना ‘ रामः शास्त्रामृतामहम् ‘ अशी त्यांची गीतेत प्रशस्ती केली आहे.अशा राजांच्या राम नवमीच्या दिनी कोल्हापूरच्या हिंदुत्ववादी संघटनेच्या प्रमुख पदाधिकारीनि छत्रपती शिवाजीमहाराज चैकात श्री रामाच्या फोटोचे पुजन करून शिर्याचा प्रसाद सर्वांना वाटुन रामनवमी साध्या पध्दतीने साजरी करण्यात आली या मध्ये हिंदुत्ववादी संघटनेचे सेवाव्रत प्रतिष्ठान कोल्हापूर… संभाजी उर्फ बंडा साळुंखे . नितेश कोकित्कर .सनी पेंडकर .अजित पाटील. सागर साळुंखे. सुहास शिंदे . मोहन देवाळकर .निरंजन दुर्गुळे. प्रीतम चव्हाण. बजरंग दल.. सिद्धार्थ कटकधोंड. अनील कोडोलीकर. युवराज भोसले. क्षत्रिय मराठा रियासत …प्रसाद मोहिते .सुनील पाटील .हिंदू एकता… अनिल चोरगे. इस्कॉन …राजू गडकरी .अमित माळी.उपस्थित होते.