नागरदळे येथील सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक रमेश गुरव सेवानिवृत्त

चंदगड प्रतिनिधी : पुंडलिक सुतार
नागरदळे तालुका चंदगड येथील सुपुत्र व मुंबई पोलीस दलातील रमेश देमाना गुरव हे संरक्षण आणि सूरक्षा विभाग व्ही टि मुंबई येथून सहायक पोलिस उपनिरीक्षक या पदावरून नुकतेच सेवानिवृत्त झाले.
त्यांचा अल्प परिचय थोडक्यात श्री रमेश गुरव यांचे शिक्षण 1982 साली कोवाड येथे दहावी पर्येंत झाले घरची परिस्थिती बेताची असलेणे नोकरी साठी त्यांनी मुंबई गाठली व हॉटेलमध्ये काम करीत करीत 1984 साली मुंबई पोलीस दलात 16 ऑगस्ट 1984 साली भरती झाले. त्या नंतर नागपूर येथे प्रशिक्षण झालेनंतर लोकमान्य टिळक मार्ग पो ठाणे मुंबई,ओशिवरा,नायगाव,भायखळा,डी एन नगर पो ठाणे, व व्हि टी मुंबई आदी ठिकाणी त्यांनी 37 वर्ष 7 महिने उत्कृष्ठ सेवा बजावून ते सेवानिवृत्त झाले. या काळात त्यांनी शिपाई,हवालदार,स पो उपनिरीक्षक आदी पदावरून सेवा बजावली. त्यांचा उलेखनिय सेवेबद्दल सत्कारही पोलीस प्रशासनाच्या वतीने झाला आहे. त्यांच्या जीवन प्रवासात आई श्रीमती रत्नाबाई, पत्नी सौ लता, मुलगा नागनाथ ( पो. कॉ. मुंबई), सून सौ श्रध्दा, नात अवनी, मुलगी आकांक्षा यांचे योगदान लाभले आहे.