ताज्या बातम्या

व्यापारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी किरण गवाणकर तर उपाध्यक्षपदी सौ. रोहिणी तांबट यांची निवड

मुरगूड प्रतिनिधी : विजय मोरबाळे

येथील श्री व्यापारी नागरी सहकारी पतसंस्थेच्या अध्यक्षपदी माजी नगरसेवक किरण गवाणकर यांची तर उपाध्यक्षपदी सौ रोहिणी तांबट यांची बिनविरोध निवड करण्यात आली . ही निवड

सहा .निबंधक ए.एन शिंदे यांच्याअध्यक्षतेखाली झाली .

यावेळी अध्यक्षपदासाठी किरण गवाणकर यांच्या नावास सुचक म्हणून प्रशांत शहा तर उपाध्यक्ष पदासाठी सौ रोहिणी तांबट यांच्या नावास सूचक म्हणून प्रकाश सनगर होते . यावेळी गवाणकर यांनी यापुढेही सर्वसामान्य सभासदांना विश्वासात घेऊन संस्थेचा कारभार पारदर्शी करणार असल्याचे सांगितले

यावेळी मावळते अध्यक्ष प्रशांत शहा, प्रकाश सणगर , संचालक साताप्पा पाटील , शशिकांत दरेकर , नामदेवराव पाटील , किशोर पोतदार , हाजी.धोंडिराम मकानदार , प्रदिप वेसणेकर , यशवंत परीट , संदिप कांबळे , सौ . संगिता नेसरीकर व कार्यलक्षी संचालक सुर्दशन हुंडेकर सह कर्मचारी वर्ग उपस्थित होता . स्वागत, प्रास्ताविक किशोर पोतदार यानी तर आभार संदीप कांबळे यानी मानले .

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks