ताज्या बातम्यामहाराष्ट्र
वेद फाउंडेशनच्यावतीने कसबा बावड्याची सुकन्या नेहा गगन पाटील-कोंडेकर यांचा सत्कार

कोल्हापूर :
कसबा बावड्याची सुकन्या नेहा गगन पाटील- कोंडेकर यांची प्रथम प्रयत्नातच पी. एस. आय. पदी निवड झाल्याबद्दल वेद फाउंडेशन यांच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
त्यावेळी नियोजनबद्ध अभ्यास व दोन्ही कुटुंबाकडील आशीर्वाद, पती गगन पाटील यांचे पाठबळ, तसेच योग्य मार्गदर्शन यामुळे हे पद संपादन करता आले, असे मत सौ.नेहा पाटील यांनी व्यक्त केले.
त्यावेळी वेद फाउंडेशनचे संस्थापक रुद्र पाटील सर, बिरदेव देवस्थान ट्रस्टचे माजी अध्यक्ष के.डी हराळे, गगन पाटील व विद्यार्थी उपस्थित होते.