वासनोली ल.पा. तलावाच्या झालेल्या नुकसानीचे शासन स्तरावर दुरुस्ती बाबत प्रयत्न करु : माजी आमदार के. पी. पाटील

भुदरगड प्रतिनिधी : प्रकाश पाटील
भुदरगड तालुक्यातील वासनोली येथे असणाऱ्या ल.पा. तलावावर आतिवृष्टीसारख्या नैसर्गिक आपत्तीने तलावाचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. तलावाच्या वेस्ट वेअर मधुन पाण्याचा झालेला प्रचंड मोठा शिरकाव परिणामी तलावाच्या परिसरात असणाऱ्या विहीरी व शेतजामिनी यांचे अस्तीत्वच नष्ट झाल्याचे चित्र आहे.यामुळे या परिसरातील शेतजामिनीचे प्रचंड मोठे नुकसान झाले आहे. याच पाश्र्वभुमीवर कालच राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर असताना जिल्हयातील पुरपरिस्थीती संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठकीत आपण स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचेसमोर ल.पा.तलावासंदर्भात नुकसानीचा प्रश्न उपास्थित केला या वर उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी या संदर्भात जिल्हाधिकारी ,व संबधित खात्याचे आधिकारी यांना तातडीने दुरुस्तीचे प्लॅन इस्टीमेट बजेट तरतुदी बाबत सुचना दिल्या. सदर तलावाचे दुरुस्ती काम मार्गी लागणार असल्याचा निर्वाळा यावेळी मा.आम.क़े.पी.पाटील यांनी दिला. ल.पा.तलावाचे स्थळी भेट देवून आपण कोणावर टिकाटिप्पनी करण्यासाठी येथे आलो नसून नैसर्गिक आपत्तीशी सामना करण्यासाठीचे आपले प्रयत्न असून याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना व्हावी यासाठी मी प्रयत्नशील रहाणार आहे. यावेळी प्रकल्प स्थळावर मृद व जलसंधारण उपविभाग चंदगडचे उप अभियंता श्री संतोष पाटील ,भुदरगड शाखा अभियंता सिद्धार्थ आबिटकर, वासनोलीचे धनाजी पाटील,मधुकर पाटील,धनाजी का. पाटील,धोंडीराम पाटील,विलास पाटील,प्रकाश डेळेकर ,बिद्री संचालक के.ना.पाटील यांचेसह प्रकल्पाचे ठेकेदार आदी उपास्थित होते.