ताज्या बातम्यामहाराष्ट्र

रेमंड कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह बोनसचा करार ; आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कर्मचारी समाधानी ; येत्या चार वर्षांसाठी भरघोस पगारवाढीसह दरवर्षी एक पगार बोनस व अनुषंगिक सेवासुविधा

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन्स लिमिटेड या कंपनीच्या कर्मचाऱ्यांना पगारवाढीसह बोनसचा करार झाला. माजी ग्रामविकास व कामगार मंत्री, आमदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत कंपनी व्यवस्थापन व कर्मचारी संघटनामध्ये हा करार झाला.

येत्या चार वर्षांसाठी झालेल्या या करारामध्ये भरघोस पगारवाढीसह दरवर्षी एक पगार बोनस देण्याचे निश्चित झाले. तसेच कर्मचाऱ्यांना सर्व अनुषंगिक सेवासुविधा व फायदे देण्याचेही करारामध्ये ठरले.

याबाबत अधिक माहिती अशी, या करारामध्ये कंपनीकडे कायम सेवेत कार्यरत असलेल्या साडेसहाशेहून अधिक कामगारांचा समावेश आहे. कंपनीचे व्हाईस प्रेसिडेंट हरीश चॅटर्जी, एच. आर. हेड प्रवीण गवळी, एच. आर. प्लांट हेड दीपक शिंदे, प्लांट हेड अरुण गोंदकर, जनरल मॅनेजर विकास राजा व संजय बोकारे आदी अधिकारी उपस्थित होते. तसेच रेमंड झांबायती कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अजित पाटील, उपाध्यक्ष उत्तम डाफळे, उपाध्यक्ष अमोल पाटील, सरचिटणीस हृदयनाथ पाटील, निलेश कडुकर, दीपक देसाई, संदीप पाटील, किरण माने, विनायक कुंभार, अमर पाटील, अतुल देसाई, रणजीत पार्टे हे पदाधिकारी उपस्थित होते.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks