गुन्हाताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्याला ऑक्सीजनसह रेमडीसिव्हीर इंजेक्शनचाही वाढीव पुरवठा सुरळीत होईल – ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

कोल्हापूर, :

कोल्हापूर जिल्ह्यासाठी आजपासूनच ऑक्‍सिजनसह रेमडीसिव्हीवर इंजेक्शनचाही वाढीव पुरवठा सुरू झालेला आहे, असा दिलासा ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला.

डी वाय पाटील मेडिकल कॉलेजमध्ये श्री मुश्रीफ पत्रकारांशी बोलत होते.

मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी उपायोजना करण्यासाठी परवाच आपण स्वतः व पालकमंत्री सतेज पाटील मुंबईला गेलो होतो. ऑक्सीजन व रेमडिसिव्हर इंजेक्शनचा पुरवठा वाढवण्यासाठी त्याठिकाणी पाठपुरावा केला. त्याचे फलित म्हणून आज जवळपास तिप्पट -चौपट इंजेक्शन उपलब्ध झाली आहेत. त्याचबरोबर १५ टन ऑक्सीजन वाढवून मिळालेला आहे. जिल्ह्य़ातील अनेक ठिकाणी बेड उपलब्ध आहेत. कोल्हापूरमध्ये परिस्थिती नियंत्रणात असून आठवड्याभरात हे सर्व आटोक्यात येईल. याआधी जिल्ह्याला दररोज सरसकट ३० टन ऑक्सिजन पुरवठा होत होता. तो वाढून उद्यापासून सरासरी ४५ टन आणि त्याहून अधिक ऑक्सिजन पुरवठा सुरळीत होईल. तसेच, याआधी जिल्ह्याला दररोज सरासरी अडीचशे ते तीनशे इंजेक्शन मिळत होती. रेमडीसिव्हीर इंजेक्शनचा पुरवठा व्यवस्थित सुरू झालेला असून आजच अडीच हजाराहून अधिक इंजेक्शन पुरवठा झालेले आहेत.
नेत्यांच्या सवडीच्या निर्णयामुळेच कोरोनाची स्थिती गंभीर झाली आहे आणि याबाबत निर्णय घेण्यात झालेल्या दिरंगाईबद्दल त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, असा आरोप माजी आमदार अमल महाडिक यांनी केला आहे. याबाबत पत्रकारांनी विचारले असता मंत्री मुश्रीफ म्हणाले, आमच्यावर आरोप करणारे माजी आमदार अमल महाडिक नुकत्याच झालेल्या गोकुळ निवडणुकीत अग्रभागी होते. त्यामुळे मनुष्यवधाच्या गुन्ह्यात त्यांनाही सहआरोपी करावे लागेल. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गाफीलपणा केला याचा परिणाम संपूर्ण देशाला भोगावे लागत आहे.
मंत्री मुश्रीफ म्हणाले, पहिल्या लाटेचा प्रभाव कमी झाल्यानंतर दुसरी लाट येण्यापूर्वी आपण सर्वजण गाफील झालो होतो. जो बायडन यांचा मुख्य सल्लागार तिची यांनी केलेल्या निवेदनाप्रमाणे कोरोना महामारीत आपण इतकं गाफील राहिलो की, या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निवडणुका घेतल्या, धार्मिक कार्ये आरंभली आणि इतकी बेफिकिरी दाखवली की आज बी – 1617 या नावाचा विषाणू सगळ्या जगाला धोकादायक झालेला आहे.

ते म्हणाले, आता आपणास माहीत आहे की, डब्ल्यूएचओचे प्रमुख हेब राईसेस म्हणतात की, भारतातील कोरोना महामारीची गंभीर परिस्थिती हृदय पिळवटून टाकणारी आहे. त्याच बरोबर युनिसेफच्या म्हणण्याप्रमाणे भारतातील आजची परिस्थिती आटोक्यात आणली नाही, तर याचा संपूर्ण जगाला धोका आहे. मुंबईचे आयुक्त चहल यांना मार्गदर्शक नेमले. त्याचबरोबर राज्यातील कोरोनाचे संकट त्यांनी नियंत्रणात आणले. मुंबईत कोरोना परिस्थितीत सुधारणा करत ऑक्सिजनचे मॅनेजमेंट केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाने महाविकास आघाडी सरकारचा गौरव केला आहे. दुसऱ्याला लाटेशी यशस्वी संघर्ष केल्यामुळे स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक केले आहे. परवा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देखील आपल्या महाराष्ट्र राज्याचे कौतुक केले आहे. हे सर्व एका बाजूला होत असताना, भारतीय जनता पक्षाचे नेते व माजी आमदार अमल महाडिक दिशाभूल करणारी वक्तव्ये करीत आहेत. कोल्हापूर जिल्ह्यात मृत्यूदर जास्त असला तरी आपण यावर नियंत्रण मिळवण्यासाठी कठोर पावले उचलायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती फक्त कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा कहर आता वाढलेलाच आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks