बोनसची नुसती घोषणाच; अंमलबजावणी नाही : कॉ. धनाजी गुरव

गारगोटी :
महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने बांधकाम कामगारांना दिवाळी दसऱ्या करिता पाच हजार रुपये सानूग्रह अनुदान देण्याची घोषणा कामगार मंत्री मा. सुरेश खाडे यांनी केली होती मात्र या घोषणेची कोणतीही अंमलबजावणी केली नाही आहे याचा निषेध महाराष्ट्र बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने कॉ. धनाजी गुरव यांनी केला.

या कल्याणकारी मंडळाकडे विस हजार कोटी शील्लक आहेत, विविध शैक्षणिक, सामाजीक, आर्थिक लाभा पेक्षा गृहोपयोगी वस्तू (भांडी) अत्यावश्यक वस्तु संच ( पेटी ) यावर सर्वात ज्यादा खर्च केला जातो. त्यांचे वाटप नेते व कार्यकर्ते जोमाने करताना दिसतात मात्र कामगारांच्या खात्यावर रोख रक्कम देणे करीता उदासीन का असा प्रश्न उभा राहतो.
ही नोंदीत बांधकाम कामगारांची चेष्टाच केलेले दिसते. मंडळाकडे वीस हजार कोटी शिल्लक असताना बांधकाम कामगारांना अडचनीच्या वेळेला पैसे देणे का टाळले अनेक संघटनांनी दिवाळी बोनस साठी गेली महिनाभर आंदोलने केली त्यावेळी का घोषणा केली नाही शेवटच्या टप्प्यात का घोषणा केली . असा सवाल कामगार नेते कॉ धनाजी यांनी केला.