ग्रामीण रुग्णालय सिद्धनेर्ली येथे लसीकरणा ठिकाणी गैरप्रकार व नियोजनाचा अभावाने वृद्ध व्यक्तींची हेळसांड.

सिध्दनेर्ली : शिवाजी पाटील
ग्रामीण रुग्णालय सिद्धनेर्ली येथे कोविड ची 2 री लस मिळणार ह्या आशेने गावातील पात्र नागरिक सरकारी रूग्णालय या ठिकाणी लस घेण्यासाठी आले परंतु त्या ठिकाणी योग्य नियोजन नसल्या कारणाने अनेक वृद्ध व्यक्तींना असह्य वेदनांना सामोरे जावे लागले तेथे कोणत्याही प्रकारची माहिती समाधान कारक मिळत नसल्या कारणाने अनेक गावातील व्यक्ती तशाच परत गेल्या.
लसचे वितरण हे प्रत्येक प्राथमिक आरोग्य केद्रंना केले जाते, आज आलेली लस सुद्धा सिद्धनेर्ली अंतर्गत ११ गावासाठीच होती. या ११ गावाव्यतरीक्त बाहेरचे लोक याठिकाणी आले आज परगावातील अनेक व्यक्तींना लसी दिल्या गेल्या ती चुक त्या लोकांची अजिबात नाही, त्या लोकांना याठिकाणी ज्या कर्मचार्यांनी बोलवुन घेतले ते कर्मचारी यामध्ये दोषी आहेत.
याशिवाय आणखी एक कहर त्याठिकाणी दिसुन आला, कर्मचार्यांचे सलग्न आलेले बाहैरील त्यांचे नातेवाईक हे नबंरने न जाता डायरेक्ट आतमध्ये जावुन लस घेत होते .
दुपारी एक वाजता 203 या आकड्या वरती लस संपली असे सांगितले आणि जेवायला सुट्टी केली, लस संपली असे सांगितलेने उर्वरित ग्रामस्थ परत गेले पण दुपारी दोन नंतर तेथील स्टाफ ने उर्वरित लस आपल्या जवळच्या नातलगांना जवळील 90 लोकांना पाच पर्यंत लस दिली ते पण सर्वजण परगावचे होतेअसे समजते मग हे गौड बंगाल काय? वयोवृद्ध लोक परत गेली,, त्यांना फेऱ्या मारायला लावणे आणि बाहेरून आपल्या नातलगांना लस बोलावून देणे कितपत योग्य आहे?यांना लस देणेसाठी कोण प्रयत्न केले?
यामुळे गावातील अनेक वृद्ध व गरजू व्यक्तींना आज लस मिळाली नाही याबद्दल नागरिकांमधून राग व खंत व्यक्त केली जात आहे
यामागे कोणाचा राजकीय हस्तक्षेप आहे?दोषीवर कारवाई होणार का?अशी नागरिकांच्यात चर्चा सुरू आहे..