ताज्या बातम्यामहाराष्ट्र
बहिरेवाडी येथे COVED-19 लसीकरण केंद्राचे सौ.शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा

वारणानगर :
बहिरेवाडी ता.पन्हाळा येथे COVED-19 लसीकरण केंद्राचे उद्घाटन वारणा भगिनी मंडळाच्या सर्वेसर्वा सौ.शुभलक्ष्मी विनयरावजी कोरे (वहिनी साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले.तसेच विद्यामंदीर बहिरेवाडी येथील प्रयोगशाळेची पाहणी त्यांनी केली व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.यावेळी वारणा दुध संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव (आण्णा) यांची प्रमुख उपस्थिती होती.बहिरेवाडी ग्रामस्थांच्या वतीने कोरे वहिनींचा केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला.
यावेळी बहिरेवाडी गावचे प्रथम लोकनियुक्त सरपंच शिरिषकुमार जाधव,उपसरपंच तानाजी जाधव,ग्रामपंचायत सदस्य दिपकराव पाटील,राजेंद्र जाधव,संपत कणसे, यांच्यासह ग्रामस्थ व बंधुभगिनी कार्यकर्ते उपस्थित होते.