गडहिंग्लजमध्ये ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते सौ. बिरेन्द्र सहदेव अडसुळे नॅशनल अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार

गडहिंग्लज प्रतिनिधी :
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते येथील सौ. बिरेंद्र सहदेव अडसुळे नॅशनल अकॅडमीच्या खेळाडूंचा सत्कार झाला. गडिंग्लज राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात हा कार्यक्रम झाला.
यावेळी बोलताना ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गडहिंग्लज शहराला शिक्षण, व्यापार, साहित्य व सांस्कृतिक यासह खेळाचीही उत्कृष्ट परंपरा आहे. या खेळाडूंनी मिळवलेले देदिप्यमान यश अभिमानास्पद आहे.
अकॅडमीच्या मुख्य प्रशिक्षक सौ. बिरेन्द्र सहदेव अडसुळे म्हणाल्या, गडहिग्लज शहरासह विशेषतः ग्रामीण भागातील खेळाडूंना विकसित करण्याच्या दृष्टीने आम्ही या अकॅडमीची स्थापना केली आहे. या खेळाडूंना जर योग्य सुविधा उपलब्ध झाल्या तर आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू तयार होतील, अशी आशा आहे.
दोन हजार मीटर धावणेमध्ये राष्ट्रीय ब्रॉंझपदक विजेती व खेलो इंडिया स्पर्धेसाठी निवड झालेली गायत्री मलगोंडा पाटील, तसेच २00 मीटर राज्य स्पर्धेसाची विजेती सुकन्या आप्पा शिवणे या खेळाडूसह पायल अरुण मोरे, रोहन केसरकर, भक्ती पोटे, प्रज्ञा शिंदे, जानवी अरुण मोरे या खेळाडूंचा यावेळी सत्कार झाला.
यावेळी गडहिंग्लज शहरासह कडगाव -कौलगे जिल्हा परिषद मतदार संघातील प्रमुख मान्यवर उपस्थित होते.