ताज्या बातम्यामहाराष्ट्रराजकीय
हसन मुश्रीफ गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात; छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले यांच्याकडून गौरवोद्गार; मुंबईत ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी झाली भेट.

मुंबई :
ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ हे गोरगरिबांना न्याय देण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतात, असे गौरवोद्गार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी काढले. मंत्री श्री. मुश्रीफ यांची काम करण्याची स्वतःची अशी एक वेगळी स्टाईल आहे, असेही ते यावेळी म्हणाले.
सार्वजनिक कामांच्या निमित्ताने श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांची मुंबईतील निवासस्थानी भेट घेतली.
यावेळी केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने हेही उपस्थित होते.