पन्हाळा : यशवंत माध्यमिक विद्यालयाचे एन.एम.एम.एस परिक्षेत घवघवीत यश

कळे-वार्ताहर अनिल सुतार
पन्हाळा तालुक्यातील सुळे येथील किसान शिक्षण प्रसारक मंडळ कोतोली संचलित यशवंत माध्यमिक विद्यालय सुळे या विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023/ 24 मध्ये झालेल्या एन.एम.एम.एस परिक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे.
यामध्ये अनुक्रमे १)गुरुदास विलास पाटील,२) उत्कर्ष दिलीप मोळे,३) अवधुत उदय पाटील ४) श्रावणी मानसिंग पाटील,५) आरती चंद्रकांत पाटील,६) ऋतुजा बापू पाटील,७) तनुष्का सचिन पाटील,८) श्रेया जालिंदर कांबळे,९) श्रद्धा दिपक पाटील,१०) सोनाली मच्छीद्र पाटील,११) सायली संजय पाटील,१२) सिद्धी अमोल गुरव,१३) साईराज प्रकाश पाटील,१४) सुशांत पंडित कांबळे या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले.
सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डी.जी.पाटील,मुख्याध्यापक यु.बी.आंबुपे,मार्गदशर्क शिक्षक डी.आर.बाडकर, यु.बी.चव्हाण, एस.आर.फिरींगे ,व्हि.ए.सणगर व सर्व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि पालक यांचे मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे परिसरातुन कौतुक होत आहे.