ताज्या बातम्या
कौलव येथे धैर्यशील पाटील कौलवकर फौंडेशनच्या वतीने वृक्षारोपन

कौलव प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरण दिना निमित्त कौलव येथे धैर्यशील पाटील कौलवकर फौंडेशनच्या वतीने वृक्षारोपन करणेत आले यावेळी भोगावती कार मा चेअरमन धैर्यशील पाटील कौलवकर यांनी मनुष्य व समस्त प्राणीमात्रांना जगण्यासाठी प्राणवायुची गरज असते आणि आजच्या या कोरोना सारख्या महामारी रोगाच्या काळात कमी भासत असलेल्या प्राणवायुसाठी प्रत्येकाने एक तरी झाड लावावे असे आवाहन केले
यावेळी दत्तात्रय पाटील, संजय नाधवडे ,विनोद जाधव,जगदीश पाटील,सतिश पाटील,शिवाजी पाटील ,सुधीर पाटील,निवास पाटील युवराज पाटील आदिसह धैर्यशील पाटील कौलवकर फौंडेशनचे कार्यकर्ते उपस्थित होते.