पोलिसांच्या रजा रोखीकरण बंदचा जी.आर. मागे

राज्यातील पोलीस शिपाई ते पोलिस निरीक्षकांपर्यंत १५ दिवसांच्या अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता.या निर्णयामुळे संपूर्ण पोलीस दलातून नाराजीचा सूर उमटला होता.
यानंतर अखेर राज्य सरकारने माघार घेत हा अर्जित रजा रोखीकरणाच्या सवलतीचा निर्णय पुन्हा जारी केला आहे.त्यामुळे राज्यातील पोलिसांना मोठा दिलासा मिळाला आहे.याबाबत एका वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार,
राज्यातील पोलिसांना १५ दिवसांची अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत दिली जात होती.मात्र, २१ फेब्रुवारी २०२४ ला शिंदे-फडणवीस सरकारने निर्णय जारी करत पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना मिळणाऱ्या या सवलतीवर गदा आणली.
गृहमंत्रालयाने अतिरिक्त अर्जित रजा रोखीकरणाची सवलत रद्द करण्याचा आदेश गृहमंत्रालयाने काढला होता.त्यानंतर संपूर्ण राज्य पोलीस दलातील पोलीस कर्मचारी आणि पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता.