गडहिंग्लज आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांचे थकित मानधन देऊन पूर्णनियुक्ती करा अन्यथा टाळे ठोक : मनसेचा इशारा

गडहिंग्लज प्रतिनिधी : सोहेल मकानदार
गडहिंग्लज उपविभागीय रुग्णालयातील कोविड,19 करिता कोविड असेपर्यंत नियुक्ती केलेल्या मेडिकल ऑफिसर,परिचारिका, लॅब टेक्निकल, फार्मा सीट यांचे थकित मानधन द्यावे तसेच पूर्णनियुक्ती करून घ्यावी या आशयचे निवेदन गडहिंग्लज तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना मनसेच्या वतीने देण्यात आला.
(C C H)सी सी एच व (D C S C) डी सी एस सी या ठिकाणी कोविड केअर सेंटर असून येथे गेल्या नऊ महिन्यांपासून काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मानधन मिळाले नाहीत त्यांच्या व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आलेली आहे त्यांचे चरितार्थ चालवणे कठीण झाले आहे तरी कोरोनाच्या या पार्श्वभूमीवर सर्व ज्यांनी गेल्या कोवीड मध्ये मेडिकल ऑफिसर, परिचारिका, व इतर कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती करून त्यांना कोविड असेपर्यंत नियुक्ती करावी,तसे न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आरोग्य कार्यालयाला टाळे ठोकण्यात येईल असा इशारा मनसे जिल्हाध्यक्ष नागेश चौगुले यांनी दिला आहे.या वेळी,अखिल भारतीय मराठा महासंघ तालुकाध्यक्ष अप्पासाहेब शिवणे,मराठी कामगार सेना उपाध्यक्ष राजाराम मंगले,यांचा समवेत कर्मचारी वर्ग-केतन सुतार,तेजस पाटील, अमित बावडेकर, सुजाता पाटील, प्रियांका नराळे, कावेरी तराळे, नीता जाधव, लक्ष्मी मतकरी, सुनेत्रा राणे, भारती कांबळे, माधुरी मांगले, सुरेश अमृतकर, शाम सावरे, निलेश वारे, रागिनी कदम, अझरुद्दीन मुल्ला, वर्षाराणी पाटील, शोभा कुंभार, माणिक माद्याळे, समीक्षा पाटील, सीमा सोनटक्के, प्रियंका मोठारे, प्रियंका कांबळे, गीता नाईक, क्रांती लोंढे, अनिता पाटील, प्रियंका पाटील, सुनील गुरव, यांच्या सह्या आहेत.