ताज्या बातम्यामहाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज पंढरीत. ; आषाढी एकादशीनिमित्त असे असणार नियोजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज आषाढी एकादशीच्या शासकीय महापूजेसाठी चार वाजण्याच्या दरम्यान पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत इतरही मंत्री सहभागी होणार आहेत. मुख्यमंत्री दोन दिवस पंढरपूर दौऱ्यावर असणार आहेत. यानिमित्त आज पर्यावरणाची वारी पंढरीच्या दारी या पर्यावरण वारीचा समारोप मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.
याशिवाय इतरही काही कार्यक्रम मुख्यमंत्री यांच्या हस्ते पार पडणार आहेत.

आषाढी एकादशीनिमित्त असे असणार मुख्यमंत्र्यांचे नियोजन –

उद्या पहाटे 29 जून रोजी मुख्यमंत्री विठुरायाच्या शासकीय महापूजेसाठी मंदिरात जाणार आहेत.शासकीय पूजेनंतर मंदिर समितीकडून होणार सत्कार स्वीकारून पहाटे साडे चार वाजता विश्रामगृहाकडे निघणार आहेत.

29 जून रोजी सकाळी 10 वाजता विश्रामगृह येथे अनुकंपा तत्त्वावरील नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम होणार आहे.सकाळी अकरा वाजता तीन रस्ता येथे आषाढी एकादशी निमित्त होणाऱ्या अन्नदान कार्यक्रमात उपस्थिती लावणार आहेत.
दुपारी साडे अकरा वाजता तीन रस्ता येथे सुरु असलेल्या महाआरोग्य शिबिरात जाऊन वारकऱ्यांशी संवाद आणि महाशिबीराची पाहणी करणार आहेत.

दुपारी बारा वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये असलेल्या कृषी प्रदर्शनाला भेट देणार असून तेथून पुन्हा मुख्यमंत्री हेलिकॉप्टरने सोलापूरकडे रवाना होणार आहे.दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ यांच्या पंढरपूर दौऱ्यादरम्यान केंद्रीय रेल्वेराज्य मंत्री रावसाहेब दानवे हे देखील आषाढी सोहळ्यासाठी पोहोचणार आहेत.

याशिवाय महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील,
कामगार मंत्री सुरेश खाडे, कृषीमंत्री अब्दुल सत्तार,
शालेय शिक्षण मंत्रीbदीपक केसरकर, ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, आरोग्यमंत्री डॉ तानाजी सावंत हे मंत्री देखील असणार आहेत.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks