भारतातील पहिली पाण्याखालून धावणारी मेट्रो ; पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन

देशातील पहिली पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचे उद्धघाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी करणार आहेत.कोलकाता शहरात मोठा इतिहास रचला जाणार आहे.यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगाल दौऱ्यावर असून ते कोलकाता येथील एका कार्यक्रमात अंडरवॉटर अर्थात पाण्याखालून धावणाऱ्या मेट्रोचे उद्घाटन करणार आहे.ही पाण्याखालील मेट्रो हुगळी नदीखाली बांधण्यात आली आहे.
या मेट्रोची वैयष्टिये काय असणार ते आपण जाणून घेऊयात…
हुगळी नदीवर धावणारी देशातील पहिली पाण्याखालील मेट्रो रेल्वे कोलकाता आणि हावडा यांना जोडेल आहे. कोलकाता मेट्रोचा हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो बोगदा हा भारतातील नदीखाली बांधलेला पहिला बोगदा आहे. हावडा मेट्रो स्टेशन हे भारतातील सर्वात खोल मेट्रो स्टेशन आहे.या मेट्रोचे विशिष्ट म्हणजे यात 10.8 किमी भाग भूमिगत आहे.हा भारतातील अशा प्रकारचा पहिला वाहतूक प्रकल्प आहे,ज्यामध्ये मेट्रो रेल्वे नदीखाली बांधलेल्या बोगद्यामधून जाणार आहे.तब्बल 16.5 किमी लांबीचा मेट्रो मार्ग हुगळीच्या पश्चिम किनाऱ्यावरील हावडा आणि पूर्व किनाऱ्यावरील सॉल्ट लेक सिटीला जोडतो.एस्प्लेनेड ते हुगळी नदी दरम्यान टनेलच्या माध्यमातून हावडा मैदानापर्यंत मेट्रोचे ट्रायल रन केले गेले आहे.काही दिवसांपूर्वी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी देखील या मेट्रो रेल्वे सेवांचा आढावा घेतला घेत सुरू असलेल्या कामाची पाहणी केली होती.
विविध विकास कामांचे मोदींच्या हस्ते उद्घाटन…
याशिवाय कोलकाता मेट्रोच्या हावडा मैदान-एस्प्लेनेड मेट्रो सेक्शन,कवी सुभाष स्टेशन-हेमंत मुखोपाध्याय मेट्रो सेक्शन आणि तरातला-माजेरहाट मेट्रो सेक्शनचे पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.तसेच पिंपरी चिंचवड मेट्रो-निगडी दरम्यान पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्प टप्पा
1 च्या विस्तारीकरणाची पायाभरणीही पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाइन होणार आहे.