माजी स्थायी सभापती मा. शारंगधर देशमुख (साहेब) यांनी केलेल्या आव्हानास प्रतिसाद देत 61वा वाढदिवस साजरा न करता डी.व्ही. गुरव यांनी राजोपाध्ये नगर कोव्हिड सेंटरला मदत करत जपली सामाजिक बांधिलकी

कोल्हापूर : रोहन भिऊंगडे
मा.डी.व्ही.गुरव (केळोशीकर) विमाएजंट व सामाजिक कार्यकर्ते रा.आहिल्याबाई होळकर नगर यांनी मा.शारंगधर देशमुख (माजी स्थायी सभापती) यानी केलेल्या आवाहनास प्रतिसाद देऊन आपला स्वत:चा 61 वा वाढदिवस 1 जुन रोजी होता तो साजरा न करता आपल्या वाढदिवसाच्या खर्चाला फाटा देऊन सामजिक बांधलकी मधुन राजोपाध्येनगर येथील कोव्हीड सेटंर साठी 10000/- दहा हजार रूपये रोख देणगी स्वरूपात मा.शारंगधर देशमुख यांच्या कडे सुपुर्द केली या प्रसंगी मा.गुरुप्रसाद जोशी ,मा.किरण पाटील ,मा.राजु बेले,मा.रवी जोशी व ईतर मंडळी उपस्थित होते.
तसेच आपल्या काँलनीतील लोकांना सँनिटायझर वाटप केले. गेली 30 वर्ष ते आपल्या एल.आय.सी ग्राहकांची प्रामाणिक पणे सेवा करतात, दरवर्षी दिवाळी व आपला वाढदिवस सामजिक कार्य करत असतात वुद्धाश्रम येथे फराळ वाटप तसेच अंध विद्यार्थ्यांना मोफत योगासन शिकवतात. आपल्या बेताच्या परिस्थिति मध्ये गुरव कुटुंब सामाजिक भान राखुन आहेत यांचे कौतुक लोकांच्यामधुन होत आहे.