गुढीपाडवा होईपर्यंत कारवाई करू नका चेंबर्स ऑफ कॉमर्स ची मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी

कोल्हापुर : रोहन भिऊंगडे
गुढीपाडवा होईपर्यंत कारवाई करू नका कोल्हापूर चेंबर्स ऑफ कॉमर्स ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे मागणी पुरणाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने अनेक कडक निर्बंध लागू केले आहेत. याचा सर्वात अधिक त्रास व्यापाऱ्यांना होत आहे. यावर मार्ग काढण्यासाठी कोल्हापुरात व्यापारी आणि प्रशासनाची महत्वाची बैठक झाली. जिल्हाधिकार्यालय आजच्या बैठकीत झालेल्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ होते. यावेळी चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांनी गुढीपाडवा होईपर्यंत कारवाई करू नका अशी मागणी मंत्री मुश्रीफ यांना केली आहे. तसेच महापालिकेने व्यावसायिकांवर सुरू केलेली कारवाई ताबडतोब थांबवावी. अशी मागणी चेंबर ऑफ कॉमर्स च्या वतीने करण्यात आली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी दौलत देसाई, यांच्यासह जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित होते. यावेळी हसन मुश्रीफ यांनी आपण व्यवहारिक दृष्टीकोन ठेवून मार्ग काढू असे चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.