कोरोनाबाबत मला काय होत नाही.या भ्रमात राहू नका : राजेसमरजितसिंह घाटगे

मुरगूड,प्रतिनिधी : विजय मोरबाळे
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्गामध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग होताना दिसत आहे. त्यामुळे त्यांच्यासह सर्वांनीच मला काय होते. असा अति आत्मविश्वास बाळगून भ्रमात राहू नका.नागरिकांनी दुखणे अंगावर काढू नये. असे आवाहन शाहू साखर कारखान्याचे चेअरमन व भाजपचे जिल्हाध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांनी केले.
येथील ग्रामीण रुग्णालयातील भेटी वेळी ते बोलत होते.यावेळी त्यांनी येथील केंद्रांतर्गत कोरोना प्रतिबंधक लसीकरणाबाबत माहिती घेऊन वैद्यकीय अधिकाऱ्यांशी सविस्तर चर्चा केली. तसेच या विभागात मागणीच्या प्रमाणात लस पुरवठा करणे बाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्याशी फोनवरून चर्चा केली.
ते पुढे म्हणाले,दुसऱ्या लाटेमध्ये तरूण वर्ग व लहान मुलांना संसर्ग मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.मात्र तरुण वर्ग मोठ्या प्रमाणात बेफिकीरपणे वागत आहे. कोरोना प्रतिबंधक खबरदारीही घेत नाहीत. त्यामुळे त्यांच्यासह कुटुंबीयांचे आरोग्य धोक्यात येत आहे. याबाबत तरुणांनी आतिआत्मविश्वास न बाळगता आवश्यक ती खबरदारी घ्यावी. कोणतेही दुखणे अंगावर न काढता वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेऊन औषधोपचार घ्यावेत. असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ डी बी डवरी डॉ अमोल पाटील यांच्यासह दत्तामामा खराडे,शाहू कृषी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन अनंत फर्नांडिस अमर चौगुले विजय राजिगरे सदाशिव गोधडे युवराज कांबळे सुशांत मांगोरे आदी उपस्थित होते .
अभिमान कोरोना योद्ध्यांचा
यावेळी श्री. घाटगे यांनी या रुग्णालयात काम करणाऱ्या सर्वच कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या सुरू असलेल्या सेवेबद्दल गौरवोद्गार काढले व आपण करत असलेल्या सेवेचा मला अभिमान आहे. विशेषतः महिला कर्मचाऱ्यांना कौटुंबिक जबाबदारी,लहान मुलांचे संगोपन, स्वतःचे आरोग्य सांभाळून सेवा कर्तव्य पार पाडावे लागत आहे.हे अभिमानास्पद आहे.आपल्याला कोणतीही अडचण आली तर कधीही संपर्क करा.आपल्या पाठीशी मी नेहमीच ठामपणे उभा आहे. अशी ग्वाहीही त्यांना दिली.