ताज्या बातम्यामहाराष्ट्र
करवीर : कसबा बीड , बीडशेड , गणेशवाडी या गावात कडकडीत गाव बंद

सावरवाडी प्रतिनिधी :
कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाचे सर्व नियमाचे पालन करीत करवीर तालुक्यातील कसबा बीड , बीड शेड , गणेशवाडी , या तीन गावे शनिवार व रविवार दोन दिवस कडकडीत बंद पाळण्यात आले . गावातील बाजारपेठा , बाजार, सहकारी संस्था बंद ठेवण्यात आल्या आहे .
ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी शासनाच्या नियमांचे कडक पालन करून शनिवार रविवार या दोन दिवस बंद पाळण्यात आला आहे . बंदमधून दवाखाने , मेडीकल दुकाने , दुध संस्थांचे दुध संकलन यांना वगळण्यात आले आहे . ग्रामीण बाजारपेठा , दुकाने , व्यापार लाईन , सहकारी संस्था कार्यालये , भाजी मंडई, आदि बंद ठेवण्यात आले आहे .
ग्रामपंचायतीतर्फ कडक लॉकडाऊन पाळण्यात आले असल्याने तीन गावे कडकडीत बंद ठेवण्यात आली होती