ताज्या बातम्यामहाराष्ट्र
ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हातर्फ कसबा बीड येथे आरोग्य कर्मचाऱ्याना सॅनिटायझर , मास्क वाटप.

सावरवाडी प्रतिनिधी :
कोरोना सारख्या महाभयंकर साथीत आपल्या कुटुंबाचा विचार व जिवाची पर्वा न करता अहोरात्र कष्ट करणाऱ्या आरोग्य सेविका, डाॅक्टर,आशा वर्कर्स यांना करीता ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा यांचे वतीने प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कसबा बीड ( ता करवीर ) येथील कर्मचार्यांना सॅनिटायझर व मास्क वाटप करणेत आले.
यावेळी करवीर पंचायत समिती माजी सभापती राजेंद्र सुर्यवंशी, ग्राहक पंचायत महाराष्ट्र कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष जगदीश पाटील,आरोग्य सेविका अर्चना खोत,आरोग्य सेवक गणेश पाटील,सिएचओ वनिता जाधव,एकनाथ दुर्गुळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.