ताज्या बातम्यामहाराष्ट्र
शरद पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षांचे वाटप

मुरगुड प्रतिनिधी :
सावर्डे ता.कागल येथील सामाजिक कार्यकर्ते शरद पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 325 ग्रुप च्या वतीने तब्बल तीस वृक्षांचे वाटप करण्यात आले .शरद पाटील यांनी वाढदिवसाला होणारा अनावश्यक खर्च टाळून एक नवीन सुंदर उपक्रम राबविला आहे. तसेच दिलेल्या वृक्षांचे चांगल्या वृत्तीने संगोपन करण्याचेही आवाहन पाटील यांनी उपस्थित नागरिकांना केले आहे.या सामाजिक उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
यावेळी विनायक पाटील, अंकुश अब्दागिरे, बंडा पाटील ,संतोष हिरुगडे ,संग्राम पाटील , नेताजी पाटील ,साताप्पा पाटील यांचेसह ग्रामस्थ उपस्थित होते.