ताज्या बातम्यामहाराष्ट्र

निराधारांचा आत्मसन्मान जपणे आमचे कर्तव्यच : राजे समरजीतसिंह घाटगे ; निराधार योजनेतील पात्र लाभार्थींना मंजूर पत्रांचे वाटप

कागल प्रतिनिधी : विजय मोरबाळे

संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निराधार
योजनेतील लाभार्थ्यांचा आत्मसन्मान जपणे आमचे कर्तव्यच असल्याचे प्रतिपादन भाजपाचे नेते,शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजीतसिंह घाटगे यांनी केले.

कागल येथे निराधार योजनेतील महिलांना मंजूर पत्रांचे वाटप करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते.यावेळी संजय गांधी, इंदिरा गांधी, श्रावणबाळ निराधार योजनेतील पात्र लाभार्थी महीलांना राजे समरजीतसिंह घाटगे यांच्या हस्ते मंजूरी पत्रांचे वाटप करण्यात आले.

यावेळी,संजय गांधी निराधार योजनेतून कायमस्वरूपी पेन्शन मंजूर करण्यासाठी यशस्वी पाठपुरावा केल्याबद्दल राजे समरजीतसिंह घाटगे यांचा यावेळी लाभार्थी महीलांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी विक्रमसिंह जाधव, लखन हेगडे, ग्रा.पं.सदस्य प्रवीण माळी,ग्रा.पं.सदस्य बाळासाहेब हेगडे , सागर माळी, मनोज कडोले, विनोद आवळे, प्रवीण हेगडे,दिनकर वाडकर,विकी मगदूम,संदीप भारमल आदी मान्यवर उपस्थित होते. स्वागत,प्रास्ताविक अरूण गुरव यांनी केल. आभार सुदर्शन मजले यांनी मानले.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks