सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयात इंग्रजी विभागाच्या वतीने भित्तिपत्रकाचे दिमाखदार उद्घाटन

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सदाशिवराव मंडलिक महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नियमितपणे अभ्यास पूरक व अभ्यासेतर उपक्रम घेतले जातात. यामध्ये विविध विषयांवरील भितीपत्रके, गृहपाठ, प्रोजेक्ट संशोधनपर निबंध, चाचण्या असे अनेक उपक्रम घेतले जातात. त्यातीलच एक भाग म्हणून दि. 7 मार्च 2024 रोजी इंग्रजी विभागाच्या वतीने भित्तीपत्रकाचा उद्घाटन समारंभ पार पडला.
इंग्लिश फॉर बिजनेस कम्युनिकेशन या विषयांतर्गत इंग्लिश फॉर स्पेसिफिक पर्पज या मोड्युलवर आधारित इंग्रजी भाषेत जाहिरात, ईमेल, रिपोर्ट या घटकांवर बी. कॉम. भाग एकच्या कु. प्राची संजय फराकटे, कु. भाग्यश्री मारुती परीट, कु. पूजा कृष्णात कांबळे, कु. वैष्णवी बाजीराव कुंभार व कु. श्रेया संतोष कुंभार या विद्यार्थीनींनी तयार केली. त्यांना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए.डी. कुंभार यांची प्रेरणा व प्रा. व्ही. ए. प्रधान यांचे मार्गदर्शन मिळाले.
या भित्तीपत्रकाचे उद्घाटन दूधसाखर महाविद्यालयाचे इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. डॉ. सी. वाय. जाधव यांच्या हस्ते झाले. या उद्घाटन प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. टी. एम. पाटील यांनी अध्यक्षस्थान भूषवले. सूत्रसंचलन इंग्रजी विभागाचे विषय शिक्षक व एनसीसी विभाग प्रमुख लेफ्टनंट प्रा. व्ही. ए. प्रधान यांनी केले.
उपस्थितांचे स्वागत व कार्यक्रमाचे प्रास्ताविक कु. वैष्णवी कुंभार हिने केले, तर आभार प्रदर्शन कु. प्राची फराकटे हिने केले. याप्रसंगी प्रा. डॉ. एस. एम. होडगे, प्रा. डॉ. ए डी जोशी, प्रा. डॉ. एम. ए. कोळी, प्रा. डॉ. एच. एम. सोहनी, प्रा. एस. ए. दिवाण, प्रा. डी. ए. सरदेसाई, प्रा. डॉ. सौ. एम. एस. पाटील प्रा. पी. पी. कुचेकर, प्रा. सौ. एस. एस. मोरबाळे, बी. कॉम. चे इतर सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होत्या.