राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत मुरगूड च्या स्वाती शिंदेला कास्य पदक

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
जयपूर,राजस्थान येथे पार पडलेल्या वरिष्ठ राष्ट्रीय कुस्ती(senior national wrestling championship)स्पर्धेत मुरगूड येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक कुस्ती संकुलाच्या स्वाती शिंदेने 53 किलो वजनी गटात कास्य पदक पटकावले.
पहिल्या कुस्तीत तिने उत्तर प्रदेश च्या तन्नू कलाजांग डावावर मात दिली.दुसऱ्या कुस्तीत (उपांत्य फेरीत) आंतरराष्ट्रीय पदक विजेती हरयाणाची 10 :7 गुणावर स्वातीला पराभवास सामोरे जावे लागले.
पुढच्या लढतीत चंदीगडच्या माहेश्र्वरिला 10:0 गुणावर मात देऊन कास्य पदकाच्या लढतीत तिने प्रवेश केला. या लढतीत रेल्वेच्या(हरियाणा) दीपिकाला निकाल डावावर चितपट केले व कांस्यपदक मिळविले.
या यशामुळे स्वातीची भारतीय कुस्ती संघाच्या सराव शिबिरात निवड झाली आहे.तिला यापुढे आशियाई, ऑलिंपिक निवड चाचणीत सहभागी होता येईल.
स्वातीला आंतरराषट्रीय कोच दादासो लवटे तसेच वस्ताद सुखदेव येरुडकर (माजी नगराध्यक्ष),दयानंद खतकर,सागर देसाई यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच खासदार संजय मंडलिक,वीरेंद्र मंडलिक,चंद्रकांत चव्हाण, अण्णासो थोरवत,प्रशांत अथणी,जय शिवराय एज्युकेशन सोसायटी, कोल्हापूर जिल्हा तालीम संघ, मुरगूड नगर परिषद यांचे प्रोत्साहन लाभले.