Breaking News : बुलढाणा जवळ समृद्धी महामार्गावर लक्झरी बसचा भीषण अपघात ; बसच्या अपघातात 25 प्रवाशांचा होरपळून मृत्यू !

बुलढाणा जवळ समृद्धी महामार्गावर विदर्भ ट्रॅव्हल्सच्या खाजगी लक्झरी बसचा एवढा भीषण अपघात झाला की, यात चालकाला झोप लागली आणि बस पलटली. त्यातून बसचे दार दाबले गेल्याने प्रवाशांना बाहेर येताच आले नाही आणि होरपळून तब्बल 25 प्रवाशांचा मृत्यू झाला. बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा पिंपळखुटा गावानजिक समृद्धी महामार्गावर हा अपघात झाला.
नागपूरहून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर उजवीकडे एका लोखंडी खांबाला ही बस धडकली होती. आणि त्यानंतर या बसचा कंट्रोल सुटला आणि दोन्ही यांच्यामध्ये असलेल्या काँक्रीटच्या दुभाजकाला धडकल्यानंतर बस पलटी झाली डाव्या बाजूने बस पलटी झाल्याने या बसमधून कुणालाच बाहेर पडता आले नाही.
या बस मध्ये तेहतीस प्रवासी होते त्यातील फक्त आठ प्रवासी वाचले रात्री दीड वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला बस नागपूरहून पुण्याला निघाली होती या बस मध्ये यवतमाळ वर्धा नागपूर आणि पुण्यातील प्रवासी होते काही प्रवासी बसच्या काचा कडून बाहेर आले परंतु तब्बल 25 प्रवाशांना बाहेर येता आले नाही. बसने पेठ घेतला आणि बस लॉक झाल्यामुळे 25 प्रवासी मरण पावले.