कागलमध्ये सात कुटुंबाना राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना अनुदानाचे वाटप : ग्रामविकास व कामगार मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते धनादेशाचे वितरण.

कागल :
गेल्या सहा महिन्यात दारिद्र्यरेषेखालील सात कर्त्या कुटुंब प्रमुखांचे मृत्यू झाले. त्या कुटुंबांना राष्ट्रीय कुटुंब अर्थसाहाय्य योजनेतून मिळणाऱ्या प्रत्येकी वीस हजार रुपये अनुदानाचे वाटप ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कागल तालुका संजय गांधी निराधार योजना समितीचे अध्यक्ष प्रताप उर्फ भैय्या माने होते.
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचा कर्ता पुरुष गेल्यानंतर कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळतो. मुलाबाळांच्या शिक्षणासह प्रापंचिक घडीच विस्कटते. म्हणून मी विशेष सहाय खात्याचा मंत्री असताना अशा कुटुंबाला वीस हजार रुपये अर्थसहाय्याची योजना सुरू केली आहे.
गेल्या सहा महिन्यात कर्ता कुटुंब प्रमुख मृत्यू झालेल्या श्रीमती नजमा मन्सूर नायकवडी- मळगे खुर्द, राजश्री संजय शेलार -कागल, अश्विनी युवराज मगदूम – नानीबाई चिखली, साऊबाई शिवाजी फराकटे- फराकटेवाडी, मयुरी दिग्विजय केसरकर- कागल, अशिया अप्खाफ अत्तार – कसबा सांगाव या वारसदारांना धनादेशांचे वितरण झाले.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य मनोजभाऊ फराकटे, तहसीलदार सौ. शिल्पा ठोकडे, नायब तहसीलदार सौ. अर्चना कुलकर्णी, निराधार योजना समितीचे सदस्य बाळासाहेब दाईंगडे, राजू आमते, सातापा कांबळे आदी प्रमुख उपस्थित होते.