पीपीई किट घातलेला मृतदेह महामार्गालगत पडलेला, महाराष्ट्रातील घटनेनं खळबळ

पालघर :
कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात सापडत आहेत. डॉक्टर आणि नर्स आपल्या जीवाची बाजी लावून कोरोना रूग्णांवर उपचार करत आहेत. पीपीई किट घालून ते रूग्णांवर उपचार करतात. मात्र पीपीई किट घातलेला मृतदेह आढळल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. पीपीई किट घातलेला मृतहेद मुंबई-अहमदाबाद महामार्गाच्या बाजूला काही अंतरावर पडलेला होता.
ढेकाळे परिसरात हा मृतदेह आढळला आहे. धक्कादायक बाब म्हणजे हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आहे. त्यामुळे कोणीतरी घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा मृतदेह कोणाचा आहे?, नेमका कशाने मृत्यु झाला?, त्यामुळे अद्याप कोणतीही माहिती नसल्याने सर्व प्रश्नांची उत्तरे अनुत्तरीत आहे.
या घटेनची माहिती मिळताच मनोर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. कोरोनाची चालुची परिस्थिती पाहता मृतदेहाचं शवविच्छेदन करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.
दरम्यान, कोरोनाने देशभर थैमान घातलं असताना कोरोनाने अनेक मृत्यु होत आहेत. आधीच कोरोनाने मृत्यु होत असताना अशा प्रकारे मृतदेह सापडणं धक्कादायक आहे. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने घातपात असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. मात्र मृतदेह किती दिवस पीपीई किटमध्ये होता?, की कोणी घातापात करून तो पीपीई किटमध्ये भरला असे अनेक सवाल उपस्थित होत आहेत.