ताज्या बातम्यामहाराष्ट्र

##बिग ब्रेकिंग # # : संपूर्ण लॉकडाउन ची घोषणा आजच केली जाण्याची शक्यता – अस्लम शेख

मुंबई प्रतिनिधी :

करोना रुग्णसंख्येच्या वाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाउन करण्याची पूर्ण तयारी राज्य सरकारनं केली असून तशी घोषणा आजच केली जाण्याची शक्यता आहे. मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी आज तसे संकेत दिले आहेत.
करोनाच्या वाढत्या परिस्थितीला लॉकडाउनशिवाय पर्याय नसल्याचे सर्वच अधिकाऱ्यांचे आणि डॉक्टरांचे म्हणणे आहे. त्यामुळे लॉकडाउन करण्याबाबत राज्य सरकारने निश्चित केले आहे. हा लॉकडाउन कधी करायचा याबाबत कालपर्यंत चर्चा सुरू होती. मात्र, रुग्णसंख्या झपाट्यानं वाढत असल्यानं अधिक वेळ दवडण्यात अर्थ नसल्याचं सरकारचं मत बनलं आहे. त्यामुळं संपूर्ण लॉकडाउनची घोषणा आजच होण्याची शक्यता आहे. अस्लम शेख यांनी ‘एबीपी न्यूज’ या हिंदी वृत्तवाहिनीशी बोलताना ही माहिती दिली आहे.
लॉकडाउनची घोषणा आज होणार असली तरी ते प्रत्यक्षात लागू कधी होणार याबाबत अद्याप संभ्रम आहे. गुढीपाडवा आणि डॉ. बाबासोहब आंबेडकर जयंती झाल्यानंतर गुरुवार, १५ एप्रिल रोजी लॉकडाउन करण्याचा राज्य सरकारचा विचार आहे. गुरुवारी संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत पंढरपूर शहरातील पोटनिवडणुकीसाठीचा प्रचारही संपणार आहे. त्यामुळं गुरुवारी संध्याकाळपासून लॉकडाउन लागू होईल, असं बोललं जात होतं आहे. १५ एप्रिल ते ३० एप्रिल असा लॉकडाउनचा कालावधी असू शकतो. १ मे रोजी सरकारी सुट्टी असल्याने २ मे पासून पुन्हा राज्यातील परिस्थिती पूर्ववत करता येऊ शकते. मात्र, विरोधकांची तयारी न दर्शविल्यास लॉकडाउनचा कालावधी कमी होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

संबंधित लेख

Back to top button
error: Content is protected !!
Enable Notifications OK No thanks