ताज्या बातम्यामहाराष्ट्र
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सतराव्या वर्धापन दिनानिमित्त, यमगे केंद्रशाळा येथे वृक्षारोपण

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधुन महाराष्ट्र नवनिर्माण सेना कागल यांच्यावतीने केंद्रशाळा यमगे येथे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे कागल तालुका अध्यक्ष शिवतेज सुनील विभुते यांच्या मार्गदर्शनाखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला .
या कार्यक्रम प्रसंगी महाराष्ट्र नवनिर्माण रोजगार सेनेचे कागल तालुका अध्यक्ष राहुल पाटील ,सर्व शिक्षक स्टाफ, मनसे शाखा अध्यक्ष शुभम कुंभार , मनसे शाखा कार्याध्यक्ष सुदेश पेडणेकर, तसेच मनसे कार्यकर्ते तुषार पेडणेकर , ऋतुराज पाटील ,विघ्नेश पाटील, साहील गुरव , विनायक कुंभार उपस्थित होते . ह्या कार्यक्रमाचे स्वागत श्री कोळेकर सर ह्यांनी केले व आभार श्री सुनील पाटील सर ह्यांनी मानले.