कागल तालुक्यातील दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ करा ; मनसेची मागणी

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
महाराष्ट्र शासन अधिसुचना क्रमांक एसवीवाय २०२३/प्र. क्र ३७/म -७ नुसार कागल तालुक्यामधील कागल, केनवडे, कापशी, खडकेवाडा, मुरगुड, सिद्धानेर्ली हे भाग दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करण्यात आले आहेत.या अधिसुचनेमध्ये दुष्काळ परिस्थिती निवारण्यासाठी प्रशासना कडून जनतेसाठी कोणकोणत्या उपाययोजना करण्यात याव्यात.याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे.
या प्रमाणे महाराष्ट्र शासन परिच्छेद ०२ मध्ये शाळा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफ करण्यात आले आहे.या निर्णयाची तत्काळ अमलबजावणी करण्यात यावी.तसेच ज्या शैक्षणिक संस्थांनी अशा प्रकारचे शुल्क विद्यार्थ्यांच्या कडून आकारले आहे ते त्यांनी परत करावे. यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कोल्हापूर ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष नागेश चौगले आणि जिल्हा उपाध्यक्ष रोहन निर्मळ यांच्या मार्गदर्शनाखाली, मनविसेचे जिल्हाध्यक्ष प्रभात साबळे यांचे सूचनेप्रमाणे कागल गटशिक्षण अधिकाऱ्यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कागल तालुकाध्यक्ष विनायक आवळे तसेच कागल तालुका विद्यार्थी सेनेचे तालुका अध्यक्ष शिवतेज विभुते यांच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे.या वेळी महाराष्ट्र सैनिक दीपक तेली, शुभम माळी,अमोल आवळे उपस्थित होते.