ताज्या बातम्यामहाराष्ट्र
आदमापुर येथील बाळूमामांचे दर्शन १० ते १४ मार्च अखेर बंद

निकाल न्यूज प्रतिनिधी : विजय मोरबाळे
आदमापूर ता. भुदरगड येथील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले श्रीक्षेत्र सदगुरू संत बाळूमामा यांचा वार्षिक भंडारा उत्सव २० मार्च ते २८ मार्च २०२५ अखेर संपन्न होत आहे. त्यानिमित्त मंदिर, शिखर व मंदिर परीसरातील स्वच्छता करण्यासाठी दि १० मार्च ते १४ मार्च अखेर दर्शनासाठी मंदिर बंद ठेवले जाणार आहे.
सद्गुरु बाळूमामांचा वार्षिक भंडारा उत्सव पारंपारिक पद्धतीने साजरा केला जाणार असून याची तयारी व नियोजन सुरू आहे. यामुळे मंदिर व परिसराची स्वच्छता करण्यासाठी मंदिरातील दर्शन सेवा बंद करावी लागणार आहे. यामुळे पाच दिवस दर्शन सेवा व अन्नछत्र बंद राहणार असून भाविकांनी याची नोंद घेऊन मंदिर प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन देवालय समितीच्या कार्याध्यक्षा यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.