वरदच्या आरोपीस कठोर शिक्षेसाठी प्रयत्नशील ,तपासासाठी सहकार्य करा : जिल्हा पोलीस अधीक्षक बलकवडे

मुरगुड प्रतिनिधी : विजय मोरबाळे
सोनाळी (ता. कागल) येथील वरद रवींद्र पाटील याच्या निर्घृण खुनामुळे माणुसकीला काळीमा फासणारे कृत्य संशयित आरोपी दतात्रय उर्फ मारुती तुकाराम वैद्य (वय ४५, रा. सोनाळी, ता. कागल) याच्या हातून घडले आहे.
तपासासाठी सहकार्य करा, आरोपीस कठोर शिक्षा केली जाईल, अशी ग्वाही जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिली. जिल्हा अधीक्षक श्री बलकवडे यांनी सोनाळी येथे रविवारी पाटील कुटुंबीयांच्या घरी भेटून कुटुंबियांचे सांत्वन केले. रविवारी जिल्हा अधीक्षक श्री.बलकवडे यांनी सोनाळी येथे पाटील कुटुंबीयांच्या घरी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांसह कुटुंबीयांनी नराधम . आरोपी मारुती वैद्य याच्याविषयी संतप्त भावना व्यक्त केल्या. याबाबत बलकवडे कुटुंबियांशी बोलताना म्हणाले, तपासासाठी ग्रामस्थांनी सुध्दा पोलिसांना सहकार्य करणे अत्यंत गरजेचे आहे. घटनेबद्दल कुणाला चारचौघात एखादी माहिती सांगायची नसेल तर वैयक्तिक भेटून माहिती देण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. यावेळी अप्पर पोलीस अधीक्षक तिरुपती काकडे, सपोनि विकास बडवे उपस्थित होते.